Posts

अधिक छायाचित्रे

Image
 

पुस्तके

Image
 भिलार येथे उपलब्ध असलेल्य पुस्तकांचे प्रकार: १.नियतकालिके व साहित्यिक प्रदर्शनी  पुस्तके २. महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा आणि संस्कृती ३.कादंबरी  ४.बालसाहित्य  ५.चरित्रे व आत्मचरित्रे – बोलकी पुस्तके ६.संत साहित्य 7. स्त्री साहित्य 8. विविध लोकप्रिय आणि पुरस्कर विजेते 9. कथा 10. चित्रमय  पुस्तके

मुख्य आकर्षण

Image
  महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली… देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर …. या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर … अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात… दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला  पुस्तकाचं गाव  म्हणून नवी ओळख दिली. 

वैशिष्ट्ये

Image
  भिलार पुस्तक गावाची मुख्य वैशिष्ट्ये: सर्वांसाठी पुस्तके:  भिलार गावामध्ये पुस्तके सर्वांसाठी खुले आहेत. साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम:  भिलारमध्ये साहित्यिक सत्रे, कविता वाचन, आणि लेखक-प्रेक्षक संवाद असतात. शांत वातावरण:  गावाचे निसर्गसौंदर्य वाचनासाठी एक आदर्श ठिकाण बनवते. पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्था:  भिलारमधील पर्यटनामुळे गावाच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.

इतिहास

Image
भिलार पुस्तक गावाचा इतिहास भिलार  हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जे "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील पहिल्या "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून भिलारची ओळख बनली आहे. हे गाव ग्रामीण भागात वाचनाची आणि साक्षरतेची प्रेरणा देण्यासाठी एक अनोखा प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले.

भिलार : पुस्तकांचं गाव...

Image
  भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून ओळखले जाते. या गावात प्रत्येक घरात एक ग्रंथालय आहे.  पुस्तकांचे गाव  हे महाराष्ट्रातील भिलार येथील एक विशेष ग्रंथालय आहे जे ४ मे २०१७ रोजी उघडले गेले. या उपक्रमाची संकल्पना आणि नेतृत्वसांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केले होते आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .  या प्रकल्पामुळे भिलार हे गाव साहित्यिक केंद्रात रूपांतरित झाले आहे. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या पंक्ती ब्रीदवाक्य म्हणून घेऊन सुरू झालेलं भिलार हे भारतातील पहिलं 'पुस्तकांचं गाव'!