भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून ओळखले जाते. या गावात प्रत्येक घरात एक ग्रंथालय आहे. पुस्तकांचे गाव हे महाराष्ट्रातील भिलार येथील एक विशेष ग्रंथालय आहे जे ४ मे २०१७ रोजी उघडले गेले. या उपक्रमाची संकल्पना आणि नेतृत्वसांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केले होते आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले . या प्रकल्पामुळे भिलार हे गाव साहित्यिक केंद्रात रूपांतरित झाले आहे. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या पंक्ती ब्रीदवाक्य म्हणून घेऊन सुरू झालेलं भिलार हे भारतातील पहिलं 'पुस्तकांचं गाव'!
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली… देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर …. या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर … अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात… दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून नवी ओळख दिली.
भिलार पुस्तक गावाचा इतिहास भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जे "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील पहिल्या "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून भिलारची ओळख बनली आहे. हे गाव ग्रामीण भागात वाचनाची आणि साक्षरतेची प्रेरणा देण्यासाठी एक अनोखा प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले.
Comments
Post a Comment